देव

एखाद लहान बाळ जसजसं मोठ होऊ लागत तसतस त्याला वाटतं की, या जगत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचे आई-वडील. खरं तर त्याचे जगच ते असतं. जसजसं ते मोठं होऊ लागतं तसतसं त्याला समजू लागतं की, देव नावच्या गोष्टीची आपले आई-वडील पूजा करतात.; म्हणजेच त्यांच्याहीपेक्षा मोठा देव आहे. मूल आणखी मोठं झाल्यावर त्याला समजतं, की केवळ आपले आई-वडील नाही, तर अख्खी दुनिया देवाला पूजते. मग त्याला वाटू लागतं, देव म्हणजे अशी वक्ती, अशी गोष्ट जी या जगपेक्षाही मोठी आहे. 

प्रत्येकाने आपापल्या परीने देव बनवला. कोणाचा देव हवेत उडतो, कोणाचा देव पाण्यात पोहतो, कोणाचा देव सुळावर चढतो, तर कोणाचा तीन-चार दिवसात पृथ्वी तयार करतो. कोणाचा देव मांस-मच्छी खातो, तर कोणाचा देव नुसता भाजीपालाच खातो. कोणाचा देव डोळे मिटून बसतो तर कोणाचा तांडव करतो. कोणत्या देवाला टोपी घातलेली आवडते तर कोणत्या देवाला केस वाढवलेले आवडतात. कोणता देव जमिनीवर आनंद देतो तर कोणता देव जन्नतमध्ये आनंद देतो. माणसाला माहीत असलेल्या प्रत्येक रूपात माणसाने देव बनवला. आपल्या कल्पनेच्या ताकदीवर देव घडत गेला. देव ही मनावर ठसलेली एक भूमिका आहे जी प्रत्येकाला स्वतःपेक्षा मोठी वाटते. 

आता राहिला प्रश्न आस्तिक-नास्तिकतेचा, तर आस्तिक आणि नास्तिक दोघही मूर्ख असतात. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही त्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे आस्तिक आणि ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही त्या गोष्टीवर विश्वास न ठेवणारे नास्तिक मूर्खच.

"प्रत्यक्षात देव कधीच दिसू शकत नाही. आपण देवाला कागदावर रेखाटू शकत नाही, जगभरात केल्या जाणार्‍या पूजा-प्रार्थना हा देवाजवळ जाण्याचा मार्ग नाही. देव तुम्हाला कधीच काही देऊ शकत नाही आणि तुमच्याकडून काही काढूनही घेऊ शकत नाही."

खर तर देव ही मिळवण्याची गोष्ट नाहीच, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी कोणतीही गोष्ट तयार होते तिथे तयार करणारा हा असतोच. जिथ निर्माण आहे तिथे निर्माता असतोच. माणूस आपल्या परीने या निर्मात्याला ईश्वर म्हणतो, अल्ला म्हणतो, इसा वगैरे म्हणतो. 

माझा देव वेगळा आहे. डोळ्यांना दिसणारा देव, निर्माता म्हणजेच निसर्ग. ऊन, वारा, थंडी, पाऊस, दगड, नदी, अन्नधान्य, झाडं, डोंगर, फूलं, प्राणी या सार्‍यांचा निर्माता, हा निसर्ग. त्याच्यावर माझी श्रद्धा आहे.

निसर्गाला निर्माण करणारा ही कोणीतरी नक्कीच आहे, पण या एका आयुष्यात फक्त निसर्ग समजून घेतला तरी खूप झालं. कारण सर्व धर्मग्रंथांच तत्वज्ञान आणि एकट्या निसर्गाचं तत्वज्ञान यात कधीही निसर्गच वरचढ आहे. हा निसर्गरुपी देवच सगळीकडे आहे; अगदी तो तुझ्या माझ्यामध्येही आहे. 


# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)

Comments

Popular posts from this blog

नमस्कार