आठवणी
आठवणी या अशाच असतात. सिगरेटच्या झुरक्यासारख्या मनात ओढून घ्यायच्या आणि वार्यासोबत तशाच सोडून द्यायच्या. काही आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात तर काही हवेत विरून जातात. कोणाला मनात ठेवायचं अन कोणाला सोडून द्यायचं हे मात्र आपल्या हातात नसतं. त्या आठवणीमागची भावनिक तीव्रता हे ठरवत असते. आपण फक्त माध्यम व्हायचं.
# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)
Comments
Post a Comment