स्त्री
शांतपणे डोळे मिटून झोपलेली स्त्री खरच खूप सुंदर दिसते. खर तर स्त्रियांचा मेंदू म्हणजे भावनांचा प्रचंड गुंता. पुरुषांच्या मेंदुच तस नसतं. दिसायला दोन्ही मेंदू सारखेच असतात पण भावनिकतेत खूप फरक असतो. पुरुषांच्या मेंदू मध्ये 'बॉक्स' असतात, खोकंच दुसरं! नोकरीचा बॉक्स वेगळा, पगारचा बॉक्स वेगळा, बायकोचा वेगळा, घराचा, गाडीचा, मित्रांचा, दारूचा, प्रत्येकाचा वेगळा बॉक्स असतो. त्याला जो बॉक्स पाहिजे असतो तो पध्दतशीरपणे इतरांना धक्का लागू न देता तो बाहेर काढतो, त्याचा वापर करतो आणि परत त्या जागी ठेऊन देतो. या वेळी तो इतर बाकीच्या खोक्यांचा विचार करत नाही. प्रत्येक पुरुषांच्या मेंदूत आणखी एक वेगळा बॉक्स असतो - 'रिकामा बॉक्स' यात काहीच नसतं. जेव्हा केव्हा गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा तो हा बॉक्स काढतो.
अशा वेळेस तो एकेक तास समोरच्या भिंतीकडे किंवा छताकडे टक लावून पाहू शकतो कसलाही विचार न करता. रिकामा बॉक्स हा त्याच्यासाठी सर्वात सुंदर काळ असतो. पाण्यात गळ टाकून गळाला मासा लागेल म्हणून अर्धा अर्धा तास बसून राहणारा पुरुष हे 'रिकामा बॉक्स' चं अप्रतिम उदाहरण. स्त्रियांचं तस नसतं. स्त्रियांमध्ये बॉक्स नसतातच मुळी. त्यांच्या मेंदुमध्ये 'वायर्स' असतात. प्रत्येक वायर एक-दुसरीशी जोडलेली असते. पगारची वायर मित्राशी, मीटरची गाडीशी, गाडीची मुलांशी, मुलांची घराशी, घराची दारूशी ..... अशी प्रत्येक वायर एकमेकांशी जोडलेली असते. वायरींचा नुसता गुंता! शॉर्टसर्किट होण्याचे प्रचंड चान्सेस असतात. बघता बघता फ्यूज उडतात. स्त्रीची कोणती वायर कुठे जोडलेली आहे हे पुरुषाला कधीच कळत नाही. नुसता गुंता, भावनिक गुंता! जोपर्यंत स्त्री जागी असते तोपर्यंत हा गुंता जटिल होत जातो, पण डोळे झाकून शांतपणे ती झोपी गेली की निसर्गाने निर्माण केलेली फक्त 'स्त्री' होऊन जाते. सुंदर!
# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)
Comments
Post a Comment