आयुष्य

 आपण ज्याला आयुष्य म्हणून कवटाळत बसतो त्या आयुष्यावर कित्येक काव्य, कविता, तत्वज्ञानाची पुस्तकं निघलीत, भाषण-चर्चासत्र झालीत, वादविवाद झडलेत, ते आयुष्य प्रत्यक्षात खूप सोपं आहे. ज्या क्षणामध्ये आपण जगत आहोत त्या क्षणाला पुरेपूर अंनुभवण हाच खरा आयुष्याचा अर्थ. पुरेपूर अनुभवनं म्हणजे रात्रंदिवस दारू पिण किंवा इतर नशा करण होत नाही. समजा, मी तुला एक गोष्ट सांगितली, कदाचित ती गोष्ट सत्य असेल पण जर ती तुझ्या अनुभवात नसेल तर ती गोष्टच राहते. हे साडेपाच फुटांच शरीर, या शरीरामध्ये होणारी धडधड म्हणजे आयुष्य! या शरीराच्या जन्माच्या आधी काय होतं किंवा मृत्यूनंतर काय, हे आपण कधीच अनुभवू शकत नाही, त्यामुळे आपल्यासाठी त्या गोष्टी आहेत. जन्मल्यापासून आपण या पृथ्वीवरील वेगवेगळ्या घटकांना आपल्यात समाविष्ट करत वाढतो आणि मेल्यानंतर याच पृथ्वीचा भाग बनून जातो, हेच सत्य आहे. मधल्या काळात येणारा प्रत्येक क्षण अनुभवण हेच आयुष्य. तू फक्त पाच ते दहा टक्केच अनुभव घेतलास तर बरं वाटेल का? त्यासाठी तुझ्या जीवनाचा प्रत्येक पैलू तुला अनुभवता आला पाहिजे. मन मारून जगलं तर हा अनुभव कधीच घेता येत नाही. त्यासाठी मनाला वाटेल तसं केलं पाहिजे. असं केलं तर शंभर टक्के अनुभव घेता येऊ शकतो आणि प्रत्येक क्षणाला अनुभव घेत गेलं तर आयुष्याचा अर्थ काय, हा प्रश्न कधीच पडत नाही. 


# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे) 

Comments

Popular posts from this blog

नमस्कार