समानता
आजच्या काळात स्त्रिया खरोखरच प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आहेत, किंबहुना पुढेच आहेत, पण तुमच्या मनात जो समज आहे की, 'आम्ही काही पुरुषापेक्षा कमी नाही' मला चुकीचा वाटतो.
आजच्या प्रत्येक मुलीला हेच वाटतं की जे काम पुरुष करतात ते मला आलचं पाहिजे. शिक्षण घेणे, नोकरी करणे वगैरे हे आवश्यक आहेच. जोपर्यंत हे स्वतःसाठी करायचंय तोपर्यंत हे आवश्यक आहेच, पण मुद्दाम बरोबरी करायची मानसिकता मला योग्य वाटत नाही. अशी बरोबरी करण्याच्या नादात स्त्री ही स्वतःचं स्त्रीत्व हरवत चालली आहे. खरं तर बरोबर येण्याचा प्रयत्न करण्याची गरजच काही नाही. कारण स्त्री केव्हाही पुरुषापेक्षा वरचढ आहे.
तुम्ही जेव्हा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी धडपड करता तेव्हा खरंतर तुम्ही तुमची ऊंची कमी करता. विश्वाचा समतोल राखणारा घटक म्हणजे "निर्माण". निर्माण हेच सर्व गोष्टींचं मूळ आहे. निर्मितीचं सर्वोच्च काम फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते, म्हणून स्त्री कधीही श्रेष्ठच आहे.
"जे काम पुरुष करू शकतात ते काम करण्यासाठी स्त्रीचा जन्म झाला नसून, जे काम पुरुष कधीही करू शकत नाहीत ते करण्यासाठी स्त्रीचा जन्म झाला आहे."
# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)
Comments
Post a Comment