Posts

Showing posts from October, 2022

समानता

आजच्या काळात स्त्रिया खरोखरच प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आहेत, किंबहुना पुढेच आहेत, पण तुमच्या मनात जो समज आहे की, 'आम्ही काही पुरुषापेक्षा कमी नाही' मला चुकीचा वाटतो.  आजच्या प्रत्येक मुलीला हेच वाटतं की जे काम पुरुष करतात ते मला आलचं पाहिजे. शिक्षण घेणे, नोकरी करणे वगैरे हे आवश्यक आहेच. जोपर्यंत हे स्वतःसाठी करायचंय तोपर्यंत हे आवश्यक आहेच, पण मुद्दाम बरोबरी करायची मानसिकता मला योग्य वाटत नाही. अशी बरोबरी करण्याच्या नादात स्त्री ही स्वतःचं स्त्रीत्व हरवत चालली आहे. खरं तर बरोबर येण्याचा प्रयत्न करण्याची गरजच काही नाही. कारण स्त्री केव्हाही पुरुषापेक्षा वरचढ आहे.  तुम्ही जेव्हा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी धडपड करता तेव्हा खरंतर तुम्ही तुमची ऊंची कमी करता. विश्वाचा समतोल राखणारा घटक म्हणजे "निर्माण". निर्माण हेच सर्व गोष्टींचं मूळ आहे. निर्मितीचं सर्वोच्च काम फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते, म्हणून स्त्री कधीही श्रेष्ठच आहे. "जे काम पुरुष करू शकतात ते काम करण्यासाठी स्त्रीचा जन्म झाला नसून, जे काम पुरुष कधीही करू शकत नाहीत ते करण्यासाठी स्त्...

आठवणी

आठवणी या अशाच असतात. सिगरेटच्या झुरक्यासारख्या मनात ओढून घ्यायच्या आणि वार्‍यासोबत तशाच सोडून द्यायच्या. काही आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात तर काही हवेत विरून जातात. कोणाला मनात ठेवायचं अन कोणाला सोडून द्यायचं हे मात्र आपल्या हातात नसतं. त्या आठवणीमागची भावनिक तीव्रता हे ठरवत असते. आपण फक्त माध्यम व्हायचं. # संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)

देव

एखाद लहान बाळ जसजसं मोठ होऊ लागत तसतस त्याला वाटतं की, या जगत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचे आई-वडील. खरं तर त्याचे जगच ते असतं. जसजसं ते मोठं होऊ लागतं तसतसं त्याला समजू लागतं की, देव नावच्या गोष्टीची आपले आई-वडील पूजा करतात.; म्हणजेच त्यांच्याहीपेक्षा मोठा देव आहे. मूल आणखी मोठं झाल्यावर त्याला समजतं, की केवळ आपले आई-वडील नाही, तर अख्खी दुनिया देवाला पूजते. मग त्याला वाटू लागतं, देव म्हणजे अशी वक्ती, अशी गोष्ट जी या जगपेक्षाही मोठी आहे.  प्रत्येकाने आपापल्या परीने देव बनवला. कोणाचा देव हवेत उडतो, कोणाचा देव पाण्यात पोहतो, कोणाचा देव सुळावर चढतो, तर कोणाचा तीन-चार दिवसात पृथ्वी तयार करतो. कोणाचा देव मांस-मच्छी खातो, तर कोणाचा देव नुसता भाजीपालाच खातो. कोणाचा देव डोळे मिटून बसतो तर कोणाचा तांडव करतो. कोणत्या देवाला टोपी घातलेली आवडते तर कोणत्या देवाला केस वाढवलेले आवडतात. कोणता देव जमिनीवर आनंद देतो तर कोणता देव जन्नतमध्ये आनंद देतो. माणसाला माहीत असलेल्या प्रत्येक रूपात माणसाने देव बनवला. आपल्या कल्पनेच्या ताकदीवर देव घडत गेला. देव ही मनावर ठसलेली एक भूमिका आहे जी प्रत्येकाला स्व...

रोज

दररोज जगात जवळपास तीन लाख लोक नैसर्गिकरीत्या मरतात, पण आपण मरत नाही, आपण उठतोच. म्हणून रोज सकाळी आपण उठलो की स्वाहलच प्रश्न विचारायचा, 'मी जीवंत आहे का ?' स्वतःकडूनच जर उत्तर 'हो' आल तर समजायचे 'त्या' तीन लाखात मी नाही. निसर्गाने माझ्यासाठी आणखी एक दिवस दिला आहे. एक सुंदर हास्य चेहर्‍यावर आणायच आणि दिवसाला सुरवात करायची.  उत्तर 'नाही' अस आल तर मग "Rest in Peace!" # संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)