नमस्कार
आपण दोन्ही हात जोडून जो नमस्कार करतो खरंतर तो समोरच्या व्यक्तिला केलेला नमस्कार नसतोच. एवढचं काय आपण जेव्हा एखाद्या मंदिरात किंवा जिथे जिथे ईश्वराला हात जोडतो तो सुद्धा देवाला केलेला नमस्कार नसतो. "आपण जेव्हा दोन्ही हात जोडून नमस्कार करतो तेव्हा हाताची पाचही बोटं जुळलेली असतात. ही पाच बोटं आपल्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तीकडे निर्देश करतात. या वक्ती सदैव समाधानी राहाव्यात म्हणून आपण नमस्कार करतो." हात जोडलेल्या अवस्थेत आपल्या हाताचे अंगठे हे आपल्या अंगाला चिकटून असतात, किंबहुना हृदयाजवळ असतात. आपल्या आयुष्यात मोजक्याच अशा व्यक्ती असतात ज्यांचं स्थान आपल्या हृदयात असतं. त्या आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या वक्ती असतात; उदाहरणार्थ - आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, पती-पत्नी ज्यांच्याशिवाय आपलं अस्तित्व अपूर्ण असतं. ते नेहमी आनंदी, समाधानी राहावेत म्हणून आपण प्रार्थना करतो. याचंच प्रतीक म्हणजे हात जोडलेल्या अवस्थेत हृदयाशी जोडलेला अंगठा. त्यानंतर असते तर्जनी. हे बोट दिशा दर्शवण्यासाठी साधारणपणे वापरतात, किंवा एखादं लक्ष्य, ध्येय दाखविण्यासाठी वापरतात. आपल्या आयुष्यात ...