Posts

खिडक्या अर्ध्या उघड्या

 १. 'रेप्युटेशन या गोष्टीला खूप महत्व असतं. माणूस किती हुशार आहे किंवा कर्तबगार आहे यापेक्षा तो माणूस म्हणून कसा, हे बर्‍याच लोकांना अधिक महत्वाचा वाटतं. तुम्ही किती हुशार आहात, तुमचे काम याचा पुरावा देत असेलही. पण तुमचं बाकीचं वागणं या इंटेलिजन्सला शोभतंय ना? २. खरा संताप एक्स्प्रेस करायचा ना, तर तो इंडिजिनस भाषेतूनच इफेक्टिव्ह वाटतो. या इंग्लिश शिव्या अगदीच मिळमिळीत वाटतात. आणि एका 'फक' या शब्दाची करून करून किती व्हेरिएशन्स करणार, नाही का? # संदर्भ : खिडक्या अर्ध्या उघड्या (गणेश मतकरी)

नमस्कार

 आपण दोन्ही हात जोडून जो नमस्कार करतो खरंतर तो समोरच्या व्यक्तिला केलेला नमस्कार नसतोच. एवढचं काय आपण जेव्हा एखाद्या मंदिरात किंवा जिथे जिथे ईश्वराला हात जोडतो तो सुद्धा देवाला केलेला नमस्कार नसतो. "आपण जेव्हा दोन्ही हात जोडून नमस्कार करतो तेव्हा हाताची पाचही बोटं जुळलेली असतात. ही पाच बोटं आपल्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तीकडे निर्देश करतात. या वक्ती सदैव समाधानी राहाव्यात म्हणून आपण नमस्कार करतो." हात जोडलेल्या अवस्थेत आपल्या हाताचे अंगठे हे आपल्या अंगाला चिकटून असतात, किंबहुना हृदयाजवळ असतात. आपल्या आयुष्यात मोजक्याच अशा व्यक्ती असतात ज्यांचं स्थान आपल्या हृदयात असतं. त्या आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या वक्ती असतात; उदाहरणार्थ - आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, पती-पत्नी ज्यांच्याशिवाय आपलं अस्तित्व अपूर्ण असतं. ते नेहमी आनंदी, समाधानी राहावेत म्हणून आपण प्रार्थना करतो. याचंच प्रतीक म्हणजे हात जोडलेल्या अवस्थेत हृदयाशी जोडलेला अंगठा. त्यानंतर असते तर्जनी. हे बोट दिशा दर्शवण्यासाठी साधारणपणे वापरतात, किंवा एखादं लक्ष्य, ध्येय दाखविण्यासाठी वापरतात. आपल्या आयुष्यात

आयुष्य

 आपण ज्याला आयुष्य म्हणून कवटाळत बसतो त्या आयुष्यावर कित्येक काव्य, कविता, तत्वज्ञानाची पुस्तकं निघलीत, भाषण-चर्चासत्र झालीत, वादविवाद झडलेत, ते आयुष्य प्रत्यक्षात खूप सोपं आहे. ज्या क्षणामध्ये आपण जगत आहोत त्या क्षणाला पुरेपूर अंनुभवण हाच खरा आयुष्याचा अर्थ. पुरेपूर अनुभवनं म्हणजे रात्रंदिवस दारू पिण किंवा इतर नशा करण होत नाही. समजा, मी तुला एक गोष्ट सांगितली, कदाचित ती गोष्ट सत्य असेल पण जर ती तुझ्या अनुभवात नसेल तर ती गोष्टच राहते. हे साडेपाच फुटांच शरीर, या शरीरामध्ये होणारी धडधड म्हणजे आयुष्य! या शरीराच्या जन्माच्या आधी काय होतं किंवा मृत्यूनंतर काय, हे आपण कधीच अनुभवू शकत नाही, त्यामुळे आपल्यासाठी त्या गोष्टी आहेत. जन्मल्यापासून आपण या पृथ्वीवरील वेगवेगळ्या घटकांना आपल्यात समाविष्ट करत वाढतो आणि मेल्यानंतर याच पृथ्वीचा भाग बनून जातो, हेच सत्य आहे. मधल्या काळात येणारा प्रत्येक क्षण अनुभवण हेच आयुष्य. तू फक्त पाच ते दहा टक्केच अनुभव घेतलास तर बरं वाटेल का? त्यासाठी तुझ्या जीवनाचा प्रत्येक पैलू तुला अनुभवता आला पाहिजे. मन मारून जगलं तर हा अनुभव कधीच घेता येत नाही. त्यासाठी मनाला वाट

आनंद

मी जगण्याची संधि सोडत नाही. माझ्या समोर आलेला प्रत्येक क्षण मी जगतो. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाशी मी असं बोलतो-वागतो की, ही एकतर माझी पहिली किंवा शेवटची भेट आहे. ही गोष्ट खूप छोटीशी आहे, पण एकदा का याचा अर्थ समजला, की सारं काही सोपं होऊन जातं. प्रत्येक गोष्टी कडे अशा नजरेनं पहिलं पाहिजे की, एकतर आपण ती प्रथमच पाहतोय किंवा शेवटचं पाहतोय. मग अंदाज बरोबर बदलतो, आनंदाला काहीच तोटा राहत नाही. आनंद आपल्या आयुष्यात येईल म्हणून नुसती त्याची वाट पाहत राहिलं, तर वाटच पाहत राहावी लागते. मी आनंदी आहे, असा स्वतःलाच विश्वास दिला, तरच आनंदी होता येतं. आज प्रत्येकजण जी धडपड करतोय, प्रयत्न करतोय ते कोणती न कोणती गरज भागवण्याची. गरज ही प्रत्येक गोष्टीस कारणीभूत आहे. माणूस मरतो त्याच वेळी त्याच्या गरजा संपलेल्या असतात. आजच्या घडीला माणसाच्या ज्या महत्वाच्या गरजा आहेत त्यातील सर्वात मोठी गरज म्हणजे 'पैसा'. माणूस कितीही तत्वज्ञानी असेल, कल्पनेच्या जगत वावरत असेल आणि त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याला कोणीच विचारत नाही. जो खाऊन-पिऊन सुखी असतो त्यालाच वाटते की प्रेम, अध्यात्म, मन:शांती, तत्वज्ञान

स्त्री

 शांतपणे डोळे मिटून झोपलेली स्त्री खरच खूप सुंदर दिसते. खर तर स्त्रियांचा मेंदू म्हणजे भावनांचा प्रचंड गुंता. पुरुषांच्या मेंदुच तस नसतं. दिसायला दोन्ही मेंदू सारखेच असतात पण भावनिकतेत खूप फरक असतो. पुरुषांच्या मेंदू मध्ये 'बॉक्स' असतात, खोकंच दुसरं! नोकरीचा बॉक्स वेगळा, पगारचा बॉक्स वेगळा, बायकोचा वेगळा, घराचा, गाडीचा, मित्रांचा, दारूचा, प्रत्येकाचा वेगळा बॉक्स असतो. त्याला जो बॉक्स पाहिजे असतो तो पध्दतशीरपणे इतरांना धक्का लागू न देता तो बाहेर काढतो, त्याचा वापर करतो आणि परत त्या जागी ठेऊन देतो. या वेळी तो इतर बाकीच्या खोक्यांचा विचार करत नाही. प्रत्येक पुरुषांच्या मेंदूत आणखी एक वेगळा बॉक्स असतो - 'रिकामा बॉक्स' यात काहीच नसतं. जेव्हा केव्हा गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा तो हा बॉक्स काढतो. अशा वेळेस तो एकेक तास समोरच्या भिंतीकडे किंवा छताकडे टक लावून पाहू शकतो कसलाही विचार न करता. रिकामा बॉक्स हा त्याच्यासाठी सर्वात सुंदर काळ असतो. पाण्यात गळ टाकून गळाला मासा लागेल म्हणून अर्धा अर्धा तास बसून राहणारा पुरुष हे 'रिकामा बॉक्स' चं अप्रतिम उदाहरण. स्त्रियांचं तस नस

नशीब

आपलं रोजचं जगणं आपल्याला क्षणाक्षणाला संकेत देत असतं. कोणी याला संधी म्हणतं, कोणी यश, कोणी अपयश, कोणी दुर्दैव तर कोणी शकुन. ज्याला जसं वाटेल तसं तो समजतो. पण शेवटी तो एक संकेतच असतो. रोजच्या जीवनात आपण सतत नकळतपणे संकेताचे अर्थ लावतो व त्यानुसार निर्णय घेतो. घेतलेला निर्णय केवळ एक निर्णय राहत नाही, तर निर्णयाची मालिका तयार होते आणि निर्णयाचा प्रचंड प्रवाह बनतो. कुठलीतरी अज्ञात शक्ति या प्रवाहात सतत आपल्यासोबत असते. आपण एकटे कधीच नसतो. त्या अज्ञात शक्तीला माणसाने दिलेलं नाव म्हणजे - नशीब! निर्णयांचा प्रवाह म्हणजे आपले प्रयत्न आणि त्याला साथ देणारी अज्ञात शक्ति म्हणजे नशीब. प्रयत्नाला नशिबाची साथ असण यालाच म्हणतात. माणसाचे प्रयत्न या नशीब नावाच्या शक्तिसमोर खूपच तोकडे असतात. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपला जन्म. सार काही आहे त्या जन्मामुळे आणि जन्म घेण्यासाठी आपले प्रयत्न 'शून्य' असतात. कुठली तरी अज्ञात शक्ति आपल्याला अलगद हातांनी या जगात पाठवते. ही शक्ति आपली साथ कधीच सोडत नाही. ती प्रत्येक क्षणाला सोबत राहतेच. या जगात आल्यावर सुरू होते एक मालिका - योगायोगांची आण

समानता

आजच्या काळात स्त्रिया खरोखरच प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आहेत, किंबहुना पुढेच आहेत, पण तुमच्या मनात जो समज आहे की, 'आम्ही काही पुरुषापेक्षा कमी नाही' मला चुकीचा वाटतो.  आजच्या प्रत्येक मुलीला हेच वाटतं की जे काम पुरुष करतात ते मला आलचं पाहिजे. शिक्षण घेणे, नोकरी करणे वगैरे हे आवश्यक आहेच. जोपर्यंत हे स्वतःसाठी करायचंय तोपर्यंत हे आवश्यक आहेच, पण मुद्दाम बरोबरी करायची मानसिकता मला योग्य वाटत नाही. अशी बरोबरी करण्याच्या नादात स्त्री ही स्वतःचं स्त्रीत्व हरवत चालली आहे. खरं तर बरोबर येण्याचा प्रयत्न करण्याची गरजच काही नाही. कारण स्त्री केव्हाही पुरुषापेक्षा वरचढ आहे.  तुम्ही जेव्हा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी धडपड करता तेव्हा खरंतर तुम्ही तुमची ऊंची कमी करता. विश्वाचा समतोल राखणारा घटक म्हणजे "निर्माण". निर्माण हेच सर्व गोष्टींचं मूळ आहे. निर्मितीचं सर्वोच्च काम फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते, म्हणून स्त्री कधीही श्रेष्ठच आहे. "जे काम पुरुष करू शकतात ते काम करण्यासाठी स्त्रीचा जन्म झाला नसून, जे काम पुरुष कधीही करू शकत नाहीत ते करण्यासाठी स्त्